प्रेक्षकांसाठी खास ऑफर! सोनू सूदचा चित्रपट पाहता येणार अवघ्या 99 रुपयांत

Sonu Sood | अभिनेता सोनू सूद हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्यासोबतच तो गरजूंना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतो. सोनू सूदचा ‘फतेह’ चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे विशेष म्हणजे सोनू सूदने चाहत्यांसाठी खास सवलत दिली आहे. ‘फतेह’ चित्रपट प्रेक्षकांना 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. सोनू सूदने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे सोनू सुदने ही घोषणा केली आहे.
या व्हिडिओत तो म्हणतो की, “जेव्हा संपूर्ण कोविड सुरू झाला, तेव्हा हजारो आणि लाखो लोक मदतीसाठी माझ्याकडे येऊ इच्छित होते. त्यांच्यासोबत सायबर फसवणूक होऊ लागली. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. मला हे अजिबात आवडलं नाही. म्हणून मी विचार करत होतो की तुमच्यासाठी बनवलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि थिएटरमध्ये कसा प्रदर्शित होईल?
View this post on Instagram
आता हा सिनेमा १० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तर तुमच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी ‘फतेह’च्या तिकिटाची किंमत ९९ रुपये असेल. तसेच चित्रपटातून मिळणारा नफा हा धर्मादाय संस्थेला दान केला जाणार आहे.” सोनू सुदच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरील चाहते त्याचे कौतुक करत आहेत. Sonu Sood |
‘फतेह’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असणार आहे. यात जॅकलीन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह आणि विजय राज यांच्या भूमिका आहेत. तर सोनू सूदने त्याचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा:
‘क्या ब्बात है …’, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एन्ट्री घेताच संकर्षण कऱ्हाडेचा लज्जतदार पदार्थांवर ताव





