बोलो जुबा केसरी.! भर रस्त्यात नवरदेवासमोरच नवरीने खाल्ला गुटखा; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील चक्रवाल…

नवी दिल्ली- अंमली पदार्थांचे सेवन करणे मानवी आरोग्यासाठी घातक आहे असे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले परंतु लोक त्याचे पालन करत नसल्याचे आपल्याला दिसून येते. गुटखा, तंबाखू या पदार्थांचे सेवन करण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीमधून पुरुष सहजपणे गुटख्याची पुडी घेतात आणि तोंडात टाकतात असाच काहीसा प्रकार राजस्थान मध्ये घडला आहे.
परंतु यावेळेस पुरुषाने नव्हे तर चक्क एका महिलेनेच गुटखा खाल्ला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
झालं असं की.., राजस्थानमधील बारन येथे रविवारी (26 मे) रोजी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाहामध्ये 2 हजार 222 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले आहे. लग्न सोहळा आवरला आणि लोक घरी आपपल्या निघाले.
याचवेळी एक नवरी आपल्या सासरी जाण्यासाठी उभी दिसत आहे. रस्त्यावर तिचा नवरा फोनवर बोलत असताना त्याच्या समोरच ती गुटख्याची पुडी तोंडात टाकतांना दिसत आहे.
दरम्यान, सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर या संपूर्ण प्रकरावर नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. तसेच यावर अनेकांनी कमेंट देखील करण्यास सुरुवात केली आहे.





