सपा खासदारावर तालिबान्यांची भारतीय स्वातंत्र्य सैनिकांसोबत तुलना केल्याचा आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर रविवारी तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला. तालिबानच्या केवळ ६० हजार सैनिकांनी अफगाणिस्तानचा पराभव करत देश हाती घेतला. दरम्यान, जगात झालेल्या या मोठ्या घडामोडीचे पडसाद भारतातही पाहायला मिळाले. समाजवादी पक्षाचे खासदार डॉ.शफी कुर्रहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या युद्धाचे समर्थन केले आहे. तसेच तालिबान्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांसोबत केली आहे.
डॉ. शफी कुर्रहमान बर्क यांनी तालिबानच्या लढ्याची तुलना चक्क भारतीय स्वातंत्र्य लढ्या सोबत केली आहे. जेंव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते आणि त्यावेळी त्यांना देशातून हाकलून लावण्यासाठी जो संघर्ष आपण केला तसाच संघर्ष तालिबान्यांनी केला, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार महोदयांनी केले. त्यांच्या या वक्तव्य सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा0 सांसद डॉ0 शफीकुर्रहमान बर्क व 02 अन्य व्यक्तियों के विरुद्ध अभियोग पंजीकृत किये जाने के सम्बन्ध में #SPSambhal @chakreshm द्वारा दी गयी बाइट।#UPPolice pic.twitter.com/8fqNBZLxrf
— SAMBHAL POLICE (@sambhalpolice) August 18, 2021
संभल एसपी म्हणाले की, त्यांनी तालिबानी लढाऊंची तुलना स्वातंत्र्य सैनिकांशी केल्याचे कळले होते, म्हणून त्यांच्याविरोधात IPC चे कलम 153A, 124 अ आणि 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपा खासदार व्यतिरिक्त, इतर दोन लोकांनाही त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले असल्याने त्यांच्या विरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बर्क यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून बर्क यांनी सार्वजनीकरित्या माफी मागावी अशी मागणी केली आहे. बर्क यांनी केलेले विधान हे स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागावी असे भाजपने म्हटले आहे.




