Nagar | सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्यावा – छावा संघटना श्रीरामपूर

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी औसा जि. लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे उपोषण चालू आहे.
या उपोषणास पाठिंबा देण्यासठी उद्या येथील सोयाबीन खरेदी बंद ठेवावी, अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी बाजार समितीमध्ये दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला केंद्र सरकारने ४८९२/- रु हमीभाव जाहीर केला आहे. तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
सोयाबीनला ८५००/- रु हमीभाव घावा तरच शेतकऱ्यांना परवडणारा आहे. कारण उत्पन्नापेक्षा सोयीबीन पेरणी व काढणी खर्च जास्त आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने ८५००/- रुपये भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी औसा येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे सुरू असलेल्या पोषणास आम्ही जाहीर पाठींबा देत आहोत.
या आंदोलनास पाठिंबा म्हणून दि. १ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर, उपबाजार, टाकळीभान, उपबाजार बेलापूर याठिकाणची सोयाबीनची खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवून अखिल भारतीय छावा संघटनेच्या आंदोलनास सहभागी व्हावे. खेडोपाडी खासगी व्यापारी खेडा खरेदीच्या माध्यमातनू शेतकऱ्यंना हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
त्यावर बाजार समितीने नियंत्रण ठेवावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने बाजार समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.
यावर तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा श्रीरामपूरसह राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाबळे व संचालक राजेंद्र पाउलबुद्धे यांनी निवेदन स्वीकारले. जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, प्रवीण देवकर, सचिन गवळी, अक्षय पटारे, अनिल उंडे, सुधीर खपके, अरुण पाटोळे, शरद बोंबले, हेमंत मोहिते, गोरख शेजुळ आदी उपस्थित होते.





