रुपेरी पडद्यावर साउथचा मसाला पुन्हा ठरला हिट; ‘अखंडा’ने सिनेमागृहात घातला धुमाकूळ

मुंबई – दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नंदामुरी बालकृष्ण याचा 20 तारखेला रिलीज झालेला बहुचर्चित ‘अखंडा’ चित्रपट सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालत आहे. ‘अखंडा’ जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असा चित्रपट असून, यामध्ये बालकृष्णचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन सिनेरसिकांच्या भेटीला आले असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने मोठी जादू केली आहे.
बालकृष्णाचे चाहते त्याच्या या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर दोन वर्षांनंतर त्याचा ‘अखंडा’ हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटात नंदामुरी बालकृष्णासोबत अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल, शमना कसिन, जगपती बाबू मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर फक्त याच चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाच्या कथेत कृती, नाटक आणि धर्म यांसारख्या समस्यांची सांगड घालण्यात आली आहे. आतापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून, त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अभिनेता शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. तर, ‘अखंडा’ने देखील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर हिंदी आणि साऊथ चित्रपटांची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी ‘पुष्पा’ आणि ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी जादू पाहायला मिळाली होती.





