WTC Final 2025 : अखेर २७ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्स’ टॅग, काय आहे त्याचा इतिहास? जाणून घ्या

WTC Final 2025 South Africa’s Ends Chokers Tag after WTC Champion : इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC 2025) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सनी पराभूत करून इतिहास रचला आहे. या विजयासह टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने २७ वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. यापूर्वी १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने विल्स आंतरराष्ट्रीय चषक (आता चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकला होता. पण आज आपण या संघाला चोकर्स का म्हटले जात होते? जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेला का ‘चोकर्स’ म्हटले जायचे?
मोठ्या सामन्यांमध्ये अपयशस्वी होण्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला जागतिक क्रिकेटमध्ये ‘चोकर्स’ म्हणून ओळखले जायचे. दक्षिण आफ्रिका संघाने शेवटचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद विल्स इंटरनेशनल कप (१९९८) मध्ये मिळवले होते. या संघाने जागतिक क्रिकेटमध्ये अनेकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध केले आहे. आयसीसी स्पर्धांमधील दक्षिण आफ्रिकेच्या निराशाजनक इतिहासाची काही उदाहरणे आहेत, जी आपण जाणून घेऊया.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆🇿🇦
South Africa take home the 𝐌𝐚𝐜𝐞 👏#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/Yy4C4AQEO7
— ICC (@ICC) June 14, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य सामना –
Plenty of emotions on display at Lord’s as South Africa seal the #WTC25 Final win 😍 pic.twitter.com/jrCYfYTO3V
— ICC (@ICC) June 14, 2025
१९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील कथा मोठी नाट्यमय आहे. २१ वर्षांच्या रंगभेद-प्रेरित बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षकांची फौज होती. मात्र, उपांत्य सामन्यात पावसाने खेळात व्यत्यय आणला. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकेपुढे ७ चेंडूंमध्ये २२ धावांचे आव्हान १ चेंडूत २२ धावा असे ‘अशक्य’ संशोधित लक्ष्य बनले. परिणामी, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
वेस्ट इंडिजविरुद्धचा १९९६ च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामना –
१९९६ च्या विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत हॅन्सी क्रोन्येच्या दक्षिण आफ्रिका संघाचा दबदबा होता, कारण त्यांनी सर्व साखळी सामने जिंकले होते. मात्र, ब्रायन लाराच्या धडाकेबाज फलंदाजीने सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर रॉजर हार्पर आणि जिमी अॅडम्स यांच्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अडकत गेले आणि हा सामना १९ धावांनी गमावला.
हेही वाचा – Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा १९९९ च्या विश्वचषकातील उपांत्य सामना –
१९९९ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात निराशाजनक सामन्यांपैकी एक ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूसनरला या सामन्याने ‘ट्रॅजेडी किंग’ बनवले. २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. शेवटची जोडी खेळपट्टीवर होती. क्लूसनरने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारले, पण पुढील चेंडूवर अॅलन डोनाल्ड धावबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. सुपर सिक्स टप्प्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचला. अशा अनेक नॉक ऑऊट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने माती खाल्ल्याने त्यांना चोकर्स नावाने ओळखले जायचे.





