WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेने संपवला २७ वर्षांचा दुष्काळ! WTC चे विजेतेपद पटकावत पहिल्यांदाच ICC ट्रॉफीवर कोरलं नाव

WTC Final 2025 South Aafrica Won WTC Title : दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून पराभूत करत २०२५ चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा किताब जिंकला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सलामीवीर फलंदाज एडन मार्करम (१३६) आणि कर्णधार टेम्बा बावुमा (६६) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर संघाने हा शानदार विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली असली तरी त्यांना विजेतेपद राखता आले नाही. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले होते, पण दक्षिण आफ्रिकेने पाच गडी गमावून २८५ धावा करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी २०७ धावांवर संपुष्टात आला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर आटोपला.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆🇿🇦
South Africa take home the 𝐌𝐚𝐜𝐞 👏#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/Yy4C4AQEO7
— ICC (@ICC) June 14, 2025
एडन मार्करमने आणि टेंबा बावुमाने बजावली महत्त्वाची भूमिका –
Aiden Markram’s ton steers the way for South Africa to a historic #WTC25 Final victory 🏆
How the final day unfolded ➡️ https://t.co/BjRy7oF0Sd pic.twitter.com/GZsC1iKddr
— ICC (@ICC) June 14, 2025
पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी २८१ धावांची झाली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात धक्कादायक झाली. रियान रिकेल्टन फक्त ६ धावा करू शकला आणि मिचेल स्टार्कने त्याला बाद केले. वियान मुल्डरनेही फक्त २७ धावा केल्या आणि त्याला स्टार्कनेच पॅव्हिलियनमध्ये पाठवले. ७० धावांवर दोन गडी गमावलेल्या प्रोटियाज संघाला मोठ्या भागीदारीची गरज होती. त्यामुळे एडन मार्करमने टेंबा बावुमासोबत शतकीय भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
हेही वाचा – Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO
Aiden Markram rose to the occasion at Lord’s with a century for the ages 💯
South Africa’s hero in the Ultimate Test and the @aramco POTM 🎖️#WTC25 pic.twitter.com/3g7v9ez3dM
— ICC (@ICC) June 14, 2025
अखेरीस डेव्हिड बेडिंगहॅम आणि काइल व्हेरेने यांनी सामना संपवला आणि दक्षिण आफ्रिकेचा २७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. बेडिंगहम २१ धावा आणि व्हेरेन ४ धावा करून नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्टार्कने तीन विकेट घेतल्या, तर हेजलवूड आणि कमिन्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिका ही डब्ल्यूटीसी जेतेपद पटकावणारी तिसरी संघ आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी हे विजेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वेळा भारतीय संघ उपविजेता राहिला आहे.





