SOP for Air Ambulance : एअर ॲम्ब्युलन्ससाठी एसओपी तयार होणार; राज्य सरकारकडून 7 सदस्यीय समितीची स्थापना
ज्यभरात कार्यरत असलेल्या एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्ससाठी (SOP for Air Ambulance) एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

SOP for Air Ambulance : राज्यभरात कार्यरत असलेल्या एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्ससाठी (SOP for Air Ambulance) एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. शासकीय ठरावानुसार, अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत परिवहन, सार्वजनिक आरोग्य आणि पोलीस विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
उप परिवहन आयुक्त (रस्ते सुरक्षा कक्ष) यांची समितीच्या सदस्य-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती एसओपी (SOP for Air Ambulance) तयार करेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचवेल. समितीला दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे, असेही त्यात नमूद आहे.
१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयाला एक समिती स्थापन करून सरकारला शिफारसी सादर करण्याचे निर्देश दिले होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर हेही उपस्थित होते.
समितीच्या इतर सदस्यांमध्ये मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील,पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज,सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग,उपसंचालक जयंत मुळे आणि पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा (SOP for Air Ambulance) समावेश आहे.






