लवकरच…बिग बॅास मराठी सीझन ६ चा प्रोमो रिलीज; रितेश देशमुखचं करणार सूत्रसंचालन, ‘या’ दोन लोकप्रिय चेहऱ्यांची एंन्ट्री?

Bigg Boss Marathi 6 : बिग बॅास मराठीच्या पाचव्या सीझननंतर सर्वांना पुढच्या म्हणजेच सहाव्या सीझनची उत्सुकता लागली होती. अखेर नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सहाव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढली आहे. या नवीन सीझनची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यंदाच्या सीझनमध्ये शोचे व्होस्टिंग कोण करणार? अशी चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. पाचव्या सीझनचे व्होस्टिंग सर्वांचा लाडका रितेश देशमुख करणार आहे. ६ व्या सीझनच्या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या प्रोमोत पाहायला आला रे असा..असं म्हणत प्रोमोची सुरूवात होते आणि दारात भलीमोठी रांगोळी, दरवाज्याला झेंडूच्या फुलांचं तोरण, ढोल आणि पर्पल रंगाच्या शेरवानीमध्ये पाठमोरा अभिनेता दिसतो आहे. त्यानंतर बिग बॉस मराठी लवकरच असा टेक्स्ट समोर येतो. आला रे आला…!! आपला लाडका रितेश भाऊ आला… घेऊन एकदम लय भारी धमाका… असे कॅप्शन प्रोमाला देण्यात आले आहे. त्यामुळे सहाव्या सीझनमध्ये नवेकाही तरी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
सहाव्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धेक म्हणून बिग बॅासच्या घरात सहभागी होणार याबाबत चर्चा झडल्या असून, आता काही संभाव्य स्पर्धेकांची नावे समोर आली आहेत. प्रसिद्ध युट्युब स्टार विनायक माळी, अभिनेत्री गिरीजा प्रभू जी स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून तिने टेलिव्हजन इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. ही दोन नावे समोर आली आहेत. आणखी काही संभाव्य स्पर्धेकांची नावे समोर येणार आहेत. हा नवीन सीझन कधीपासून सुरू होणार याबाबत जाहीर करण्यात आलेले नाही. कलर्स मराठी या वाहिनीवर सहाव्या सीझनचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.





