Salman Khan: “रितेश देशमुखची नोकरी धोक्यात…”; ‘अलायन्स’मध्ये एन्ट्री घेताच सलमान खानचे विधान
Salman Khan : रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप : सच या सजा’ या शोमध्ये फराह खानसह सूत्रसंचालन करत आहे.

Salman Khan : बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खानने (Salman Khan )अलिकडेच ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. ‘अलायन्स’ (Alliance )मध्ये सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, त्याला भेटण्यासाठी सलमान खान आला आहे. त्यानंतर त्याने या शोमध्ये रितेश देशमुखच्या नावाचाही उल्लेख केला. सध्या ‘अलायन्स’चा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Salman Khan)
या प्रोमोमध्ये दिसते की, सलमान खानची हटके स्टाइलमध्ये एन्ट्री होते. सलमान खानला पाहताच इतर स्पर्धक आश्चर्यचकित होतात. त्यानंतर सोहेलने त्याला भावनिक मिठी मारल्याचे दिसून आले आहे. सोहेलने भावासमोर त्याच्या भावना व्यक्त केल्याचे प्रोमोमध्ये दिले. (Salman Khan)
View this post on Instagram
त्या प्रसंगी सोहेल म्हणतो, “आज मी खूप घाबरलो होतो.” त्यानंतर स्टोअररूमच्या दरवाजावर रागाच्या भरात लाथा मारल्याचेही त्याने भावाला सांगितले. त्यानंतर सलमानने स्पर्धकांना विचारले, “तुम्ही सोहेलला खूप स्ट्रेस देता का?” त्यावर इतर स्पर्धक “बिलकूल नाही”, असं म्हणतात. यानंतर सलमान खान, ‘मला असं वाटतंय, रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे…’, असं म्हणत सलमान खान हसतो. (Salman Khan)
सलमानने हे वक्तव्य नेमके कोणत्या संदर्भात केले, ते अजून समोर आलेले नाही; पण सलमान खानने रितेश देशमुखचा मस्करीत उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, रितेश देशमुखबाबत सलमान खान नेमकं असं का म्हणाला? हे एपिसोड बघितल्यानंतरच उघड होई (Salman Khan)
रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप : सच या सजा’ या शोमध्ये फराह खानसह सूत्रसंचालन करत आहे. लॉक अप हा रिअॅलिटी शोसुद्धा जोरदार चर्चेमध्ये असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच रितेश देशमुख व सलमान खान यांच्यातील मैत्री नेहमीच स्पष्टपणे दिसून येते. मात्र सलमानने केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Salman Khan)
हेही वाचा:





