Sonu Kakkar | बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करच्या कुटुंबासंबंधातील एक माहिती समोर आली आहे. नेहाची बहीण सोनू कक्कर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक मोठी घोषणा केली आहे. बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर यांच्याशी सर्व संबंध तोडत असल्याचं तिने या पोस्टद्वारे जाहीर केलं आहे. मात्र तिने नेमके असे का केले? असा प्रश्न आता नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सोनू कक्करची पोस्ट सोनूनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘तुम्हाला सर्वांना कळवताना मला खूप दु:ख होत आहे की मी आता दोन प्रतिभावान सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिकदृष्ट्या खूप वेदना सहन केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. आज हा निर्णय सांगताना मला खरंच खूप वाईट वाटतं आहे,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोनू कक्करने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून चांगलीच व्हायरल झाली आहे. Sonu Kakkar | यानंतर सोनूने सोशल मीडियावरील तिची ही पोस्ट डिलिट केली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. 9 एप्रिल रोज टोनीने त्याचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्येही सोनू कुठेच दिसली नव्हती. काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी सोनूचा अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटले आहे. मात्र सोनूने हा निर्णय का घेतला त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. Sonu Kakkar | दरम्यान, सोनू अनेक गायनाच्या रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहिली आहे. टोनीने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना सोनूने आवाज दिला आहे. या तिघांनी अनेकदा विविध मंचांवर एकत्र परफॉर्मसुद्धा केलं आहे. Sonu Kakkar | हेही वाचा: हरियाणा सरकारच्या ऑफरवर विनेश फोगट नाराज ; मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या मंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला