‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सोनू लवकरच अडकणार विवाहबंधनात

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला तर काही नव्या कलाकारांची देखील एन्ट्री झाली. या मालिकेत सोनू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहताने देखील मालिकेचा निरोप घेतला. यानंतर तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. लवकरच झील मेहता विवाहबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्री तिचा प्रियकर आदित्य दुबेसोबत लवकरच विवाह करणार आहे. झिलच्या लग्नाची तयारीही सुरु झाली आहे. नुकताच, झिलने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तिने बॅचलर पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने ‘Bride-to-be’ असं शोल्डर स्ट्रॅप लावला आहे. सध्या सोशल मीडियावर झिलचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. कमेंटद्वारे चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
झिलने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदित्य दुबे सोबत साखरपुडा केला आणि आता लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. आदित्य हा व्हिडीओ गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि थ्रीडी आर्टिस्ट आहे. तर अभिनेत्रीचा स्वतःचा व्यवसाय करत आहे. मालिकेचा निरोप घेतल्यानंतर झील तिच्या आईसोबत ब्यूटी बिझनेसमध्ये काम करत आहे. झील मेहता मेकअप आर्टिस्ट आहे, तर झीलची आई हेअर स्टायलिस्ट आहे.
हेही वाचा:
अल्टू अंकल आणि सोनपरीसोबत ‘फ्रुटी’ने शेअर केले लेटेस्ट फोटो; जुन्या आठवणींना दिला उजाळा





