‘वक्फ बाजार जबरदस्तीने मंजूर केलं…’ ; सोनिया गांधींनी वक्फ विधेयकावरून सरकारला घेरले

Sonia Gandhi on Waqf Bill । आज मध्यरात्री विरोधी पक्षांच्या विरोधाभासांमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. आज हे विधेयक राज्यसभेतही मंजूर होण्याची शक्यता आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या विधेयकावर मोठे विधान केले आहे. त्यासोबतच त्यांनी सरकारला या विधेयकावरून चांगलेच घेतल्याचे दिसून येत आहे.
हे विधेयक प्रभावीपणे बळजबरीने मंजूर केलं Sonia Gandhi on Waqf Bill ।
सीपीपीच्या सर्वसाधारण सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्षा आणि काँग्रेस खासदार सोनिया गांधी म्हणाल्या यांनी सरकारवर टीका केली. काल, वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ लोकसभेत मंजूर झाले आणि आज ते राज्यसभेत मांडले जाणार आहे. हे विधेयक प्रभावीपणे बळजबरीने मंजूर करण्यात आले. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. हे विधेयक संविधानावर उघड हल्ला आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी आहे. हा भाजपच्या जाणूनबुजून आखलेल्या रणनीतीचा एक भाग आहे.” असे म्हणत त्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला.
सभागृहात मोठा गोंधळ Sonia Gandhi on Waqf Bill ।
काल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर ते लोकसभेत सादर करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, एक कायदा दुसऱ्या कायद्यापेक्षा वर असू शकत नाही. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध केला आणि म्हटले की “ते वक्फ मालमत्तांसाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक असेल.”
हेही वाचा
‘पंतप्रधान मोदी चांगले मित्र, पण भारत आम्हाला वाईट…’ ; २७% टॅरीफ अन् ५ वेळा ट्रम्पच्या भाषणात भारताचा उल्लेख
“कायद्याच्या चौकटीत राह, तुमच्या शक्तीचा धाक दाखवू नका” ; सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले





