‘पंतप्रधान मोदी चांगले मित्र, पण भारत आम्हाला वाईट…’ ; २७% टॅरीफ अन् ५ वेळा ट्रम्पच्या भाषणात भारताचा उल्लेख

Donald Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये ‘मुक्ती दिन’ची घोषणा केली. भारत, चीन, जपान आणि युरोपियन युनियन सारख्या अनेक देशांवर जड शुल्क लादण्याचे धोरण सादर केले. या नवीन धोरणानुसार, भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर २६ टक्के दराने कर आकारला जाईल अशी घोषणा देखील केली आहे.
व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये ‘मुक्ती दिन’ची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले, माझ्या अमेरिकन मित्रांनो, हा तो मुक्ती दिन आहे ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. २ एप्रिल २०२५ हा दिवस अमेरिकन उद्योगाचा पुनर्जन्म होईल, अमेरिकेचे भाग्य बदलेल आणि आपण अमेरिकेला पुन्हा समृद्ध बनवण्यास सुरुवात करू.” असे आश्वासन देखील ट्रम्प यांनी यावेळी म्हटले.
भारतावर कर का लादण्यात आला? Donald Trump Tariff On India ।
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वात चांगला मित्र म्हटले. मात्र दुसरीकडे त्यांनी, मोदी आपले मित्र असून देखील भारत अमेरिकेशी योग्य वागणूक देत नसल्याचे सांगत त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनांवर ५२ टक्के कर लादत असल्याने अमेरिकाही त्या बदल्यात २६ टक्के कर लादेल” अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
कोणत्या देशांवर परिणाम झाला?
ट्रम्प यांच्या नवीन ‘परस्पर शुल्क’ धोरणांतर्गत, अनेक देशांवर शुल्क लादण्यात आले आहे.
देशाचे दर (%)
भारत २६%
चीन ३४%
युरोपियन युनियन २०%
जपान २४%
तैवान २२%
इस्रायल १७%
नवीन टॅरिफ धोरणाचा काय परिणाम होईल?
भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात.
आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची शक्यता Donald Trump Tariff On India ।
भारत आणि इतर प्रभावित देश प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करू शकतात आणि अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते. मात्र, ट्रम्पचा दावा आहे की या टॅरिफमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले जाईल. ते पुढे म्हणाले कि, हे टॅरिफ धोरणे प्रत्यक्षात खूप चांगले आहे. आम्ही आणखी जास्त शुल्क आकारण्याची योजना आखली होती, पण आम्ही ते कमी ठेवले. मात्र, अनेक अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या धोरणामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते कारण त्यामुळे जागतिक व्यापार संबंध कमकुवत होऊ शकतात.





