Sonalee Kulkarni : सोनालीच एका पॅालिटिशेनसोबत लग्न झालेलं? सुरू असलेल्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण म्हणाली….
Sonalee Kulkarni : मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी उपाधी आपल्या नावे करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने मराठी सिनेसृष्टीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असते.
सोनाली तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते. तिच्या सौंदर्य आणि ड्रेसिंग स्टाइल पाहून चाहते घायाळ होत असतात. आता सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खाजगी गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. मात्र, तिने सुरू असलेल्या चर्चांवर पूर्णविराम देत मोठा खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी सोनालीने पटलं तर घ्या या ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्याविषयी सुरू असलेल्या तिचं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालेलं?, या प्रश्वावर खुलासा केला आहे. ही गोष्ट खरी आहे की खोटी यावर सोनालीने पहिल्यांदाच स्पष्टीकरण देत एक आठवण शेअर केली आहे.
ज्यावेळी या चर्चांना उधाण आले होते, त्यावेळी सोनालीला तिच्या चुलत बहिणींचा फोन आला होता. तिने थेट तुझं एका पॅालिटिशेनसोबत लग्न झालयं असं बोललं जात असल्याचे तिने सांगितलं. यावर सोनालीने अंग माझं लग्न ठरलं तर मी तुला नाही का बोलावणार असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सोनालीने या केवळ चर्चा असल्याचं आपल्या बहिणीला स्पष्टपणे सांगितलं असल्याची आठवण तिने सांगितली.
नेमकं काय संवाद झाला होता?
माझ्या चुलत बहिणीनं देखील मला फोन करुन विचारलं की, काय तुझं लग्न झालंय का? मी तिला म्हटलं की, अगं माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवणार नाही का? बहिण आहेस ना माझी तू… त्यावर ती म्हणाली की, नाही राहून गेलं असेल घाई गडबडीत… मी म्हटलं असं कसं राहील? काहीही काय बोलतेस, मग तिनं सांगितलं की, नेत्यासोबत लग्न झालंय असं म्हटलं जातंय… त्यानं घर दिलंय… यावर सोनाली स्तब्ध झाली होती. या निव्वळ चर्चा होत्या… असं स्पष्टीकरण तिने दिलं.
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिला खरी ओळख नटरंग चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने नटरंग चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. यामध्ये ‘मितवा’, ‘हंपी’, ‘व्हिक्टोरिया एक रहस्य’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘गाढवाचं लग्न’, ‘पोश्टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
हेही वाचा : Sleep Disorder: झोपेच्या समस्या वाढल्या, मानसिक आरोग्य धोक्यात; घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर





