नेवासा – मोठ्या धुमधडक्यात आजही प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत असलेला प्रसिद्ध मराठी चिञपट गाढवाचे ‘लग्न’मधील रंभेमुळे खरी ओळख मिळालेली ‘इंद्र दरबारी नाचे सुंदरी’ अर्थात सुप्रसिद्ध मराठी चिञपट अभिनेञी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सोनाली कुलकर्णी ही भारतीय प्रजास्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भानसहिवरे (ता.नेवासा) येथील बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या जल्लोष २०२५ या वार्षिक स्नेंहसंमेलनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख डॉ.सुरेशराव बेल्हेकर व अध्यक्षा सौ.रंजनाताई बेल्हेकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री भानसहिवरे (ता.नेवासा) येथील बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेंहसंमेलनाप्रसंगी उपस्थित राहणार असल्यामुळे या अभिनेञीच्या चाहत्यांना मोठी उत्सुकत्ता लागून राहिलेली आहे. सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातच नव्हे तर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न’ यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही तिने आपल्या अभिनयाचा जलवा प्रेक्षकांना दाखविलेला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘गाढवाचं लग्न’,अजिंठा’,‘समुद्र’,‘इरादा पक्का’,‘मितवा’, ‘रमा माधव’,‘शटर’,‘बघतोस काय मुजरा कर’,‘हिरकणी’, ‘विक्की वेलिंगकर’ अशा धडाकेबाज मराठी चित्रपटांतून अभिनेञी सोनाली कुलकर्णी ही प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. अभिनय क्षेत्रात रुपेरी पडद्यावर तीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा यशस्वी पल्ला गाठलेला आहे. या सिनेक्षेत्रात तीचा झालेला प्रवास हा वास्तवात सोपा नव्हता. माञ तीने या अभिनयाच्या जोरावर यशस्वी कामगिरी केल्यामुळे मराठी चिञपट सृष्टीमध्ये अभिनेञी सोनाली हिचा प्रक्षेकवर्ग मोठा असून ती भानसहिवरे येथील बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या जल्लोष २०२५ या वार्षिक स्नेंहसंमेलनाप्रसंगी उपस्थित राहणार असल्यामुळे चाहत्यांना तीची मोठी उत्सुकत्ता लागून राहीलेली आहे. पञकार ते थेट अभिनेञी प्रवास….. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली हिचे आई – वडील लष्करात असल्यामुळे सोनाली कुलकर्णीचा जन्म एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झालेला होता. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. तर आई देखील तिथेच नोकरी करत होती. लष्करी पार्श्वभूमीमुळेच बिनधास्तपणा तीच्यामध्ये लहानपणापासूनच असून अभिनेञी सोनालीचे शिक्षण हे आर्मी स्कूल केंद्रीय विद्यालयातूनच पूर्ण झालेले आहे. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. अर्थात अभिनेत्री असण्यापूर्वी सोनाली कुलकर्णी एक पत्रकार आहे. यानंतर तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ टेलिव्हिजन अँड फिल्म प्रोडक्शन या विषयावर पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.