Sonalee Kulkarni: मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या खास गाण्यातून सोनालीचा दिलखेचक आणि हटके अवतार पाहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ हे आयटम साँग आकर्षक कोरिओग्राफी आणि भन्नाट स्टेप्समुळे विशेष ठरणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले असून संगीत पद्मनाभ गायकवाड यांनी दिले आहे. तर हे गाणे आनंदी जोशी हिने आपल्या सुरेल आवाजात सादर केले आहे.Sonalee Kulkarni या गाण्याबद्दल बोलताना सोनालीने सांगितले की, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि मनोरंजक देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” Sonalee Kulkarni Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात; ‘मंजुळा’ गाण्यातील बोल्ड लुक समोर या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. Sonalee Kulkarni महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भय, रहस्य आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा शोध घेणारा आहे. सध्या सोनालीच्या या नव्या गाण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. Sonalee Kulkarni हेही वाचा: Asim Sarode : महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? खरात प्रकरणावर असीम सरोदेंचा फडणवीसांना सवाल म्हणाले “तुम्ही अंधश्रद्धा…”