न्यू इअर सेलिब्रेशनच्या व्हिडिओवरून सोनाक्षी सिन्हा ट्रोल; दिवाळीत केलेल्या पोस्टची करून दिली आठवण

Sonakshi Sinha Troll | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने पती झहीर इक्बालसोबत ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केले. येथील अनेक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. सिडनीमधील अत्यंत सुंदर ठिकाणी हे दोघं गेले होते. 31 जानेवारीला रात्री 12 चा ठोका वाजताच सोनाक्षी आणि झहीर यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दोघांनी एकमेकांना किस केलं. सिडनीत ज्याठिकाणी हे दोघं उभे होते, तिथे मागे फटाके फुटत असल्याचं आणि आतिषबाजी होत असल्याचं पहायला मिळालं. सोनाक्षीच्या या व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. Sonakshi Sinha Troll |
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाने 2024 च्या दिवाळीला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे तिने दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना मूर्ख असं म्हटलं होतं. ‘फटाक्यांमुळे हवा अशी दिसतेय पहा. जे लोक फटाके फोडत आहेत त्यांना मी विचारू इच्छिते की, तुम्ही सर्वजण मूर्ख आहात का’, असं तिने लिहिलं होतं. सोनाक्षीची हीच पोस्ट पुन्हा शेअर करत चाहते तिला ‘ढोंगी’ असं म्हणत आहेत. Sonakshi Sinha Troll |
यावरुन काही नेटकऱ्यांनी तिला ‘इतर देशांमध्ये फटाक्यांचा आनंद घेता येतो, परंतु भारतात तिला या गोष्टीची समस्या आहे,’ असे म्हंटले आहे. या ट्रोलिंगनंतर सोनाक्षीने तिच्या व्हिडीओवरील कमेंट्स बंद केले आहेत. दरम्यान, लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर ‘तू है मेरी किरण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हेही वाचा:





