दीपिकाच्या आठ तास काम करण्याच्या मागणीवर सोनाक्षीने व्यक्त केली भूमिका

Sonakshi Sinha | अभिनेत्री दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करणार असल्याचे सांगितले होते. ज्यामुळे तिला नवा प्रोजेक्ट गमवावा लागला होता. यावरून अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली. यातच आता सोनाक्षी सिन्हाने देखील दीपिकाला पाठिंबा दिला आहे.
सोनाक्षी एका मुलाखतीदरम्यान दीपिकाच्या स्पिरिटमधील एक्झिटवर म्हणाली, ”हे खरं आहे की नाही हे माहित नाही, पण जर खरंच असं असेल तर तिची मागणी योग्य आहे. मी या इंडस्ट्रीत १५ वर्षांपासून आहे. मी अशा पुरुष कलाकारांसोबत काम केलं आहे जे दिवसाला ८ तासांपेक्षा जास्त काम करत नाहीत. मग महिला कलाकारांसाठी वेगळे नियम का? तुम्ही असं वेळापत्रक बनवू शकता ज्यामध्ये काम ८ तासांत पूर्ण करता येईल आणि ते शक्य आहे, असे मला वाटते.” Sonakshi Sinha |
पुढे सोनाक्षी म्हणाली, “जर मी असा चित्रपट करत असेल ज्यासाठी मला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे, तर मला जिममध्ये जाणं गरजेचं असेल आणि तुम्ही मला १२ ते १४ तास सेटवर ठेवलं तर मी ते करू शकणार नाही. त्या एक्स्ट्रा मेहनतीसाठी माझ्याकडे वेळच उरणार नाही. तिची मागणी अतिशय योग्य आहे कारण तुम्हाला शूटिंग व्यतिरिक्त स्वतःसाठी वेळ हवा असतो. जर मला त्या भूमिकेसाठी वेगळी मेहनत करावी लागत नसेल तर ती १२ तासांच्या शिफ्टमध्येही आनंदी आहे. मी त्यांना माझे १२ किंवा १० तास देऊ शकते,” असं मत सोनाक्षी सिन्हाने मांडलं आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोणने काही दिवसांपुर्वी ‘स्पिरीट’ चित्रपटातून एक्झिट घेतल्याची घोषणा केली होती. दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट घातली होती. ज्यावर एकमत न झाल्याने तिने हा चित्रपट सोडला होता. Sonakshi Sinha |
हेही वाचा:
“युद्धबंदीचे उल्लंघन केले तर…” ; इस्रायलची इराणला धमकी तर डोनाल्ड ट्रम्पचे मानले आभार





