सोनालाही आर्थिक अडचण?

करोनामुळे सर्वसामान्य जनतेलाच नाही तर सेलिब्रिटींना देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसिद्ध गायिका सोना मेहापात्राने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली आहे. सोनाने सांगितले की माझ्या सर्व ठेवीतले पैसे चित्रपटासाठी खर्च झाले आहेत. करोनामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली आहे.
सोना मेहापात्राने एक सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये वाईट परिस्थितीत देखील कसं आनंदी राहायचं हे सांगितलं आहे. संकटातून पळवाट काढता येत नाही, पण नाराज राहायचे की आनंदी हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा चित्रपट शटअप सोना आजही सर्व जगात प्रवास करत आहे. फेस्टिव्हल जिंकत आहे.
पुढे सोना म्हणाली, मी केलेली सर्व बचत या चित्रपटामुळे संपली आहे. महामारीने आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवले आहे. ज्याठिकाणी उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनाची ही पोस्ट आठवडाभरापूर्वीची आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करोनाचा फटका केवळ तिलाच बसलेला नाही. अन्य अनेक कलाकारांनाही त्याचा वाईट सामना करावा लागतो आहे. दोनच दिवसांपूर्वी फातिमा सना शेखनेही याबाबत प्रतिक्रिया दिली होती.
अभी तो मैं बेरोजगार हूँ असे तिने म्हटले होते. जे कलाकार बिनधास्त मन मोकळे करत आपली व्यथा मांडत आहेत, त्यांची वेदना समजते तरी, पण जे बोलतही नाहीत असे अनेक कलाकार आहे. त्यांच्याहून वाईट स्थिती तर अन्य आर्टिस्ट, वर्कर, तंत्रज्ञांची आहे.





