मुलाने केली वृद्ध आईची हत्या
Updated On:

हमीरपूर, दि. 16 – उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील टोलारावत या गावामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात एका तरुणाने आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. आईमुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आईवडिलांपासून वेगळे राहणाऱ्या शिवचरण याने आईकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून वडिलांनी त्यांच्यासोबत भांडण केले. त्याचवेळी त्याची आई त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आली. त्यामुळे रागाने मुलाने आईच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केले. डोक्याला मार लागल्याने वृद्ध आईने तत्काळ प्राण सोडले.
पोलिसांनी सांगितले की, शिवशरण रोज दारू पिण्यासाठी आणि मटका खेळण्यासाठी आईकडे पैसे मागत असे, त्यामुळे त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असत.





