नीतू कपूरचा फिटनेस मंत्रा; योगाचे महत्व दिले पटवून, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले….

Actress Neetu Kapoor : देशभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशाखापट्टन येथे योगा दिवस करत योगाचे असणारे महत्व पटवून सांगितले. सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी योग दिवसानिमित्त योग साधना करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री नीतू कपूर यांनी देखील त्यांचा योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योद्धा दिन म्हणून साजरा केला जात आहे. अभिनेत्री नीतू कपूरने सोशल मीडियावर वर्कआउट आणि योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नीतू कपूर या ६६ वर्षांच्या आहेत. पण, या वयातही त्यांचे फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत, त्या अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकतील. नितू कपूर या नियमितपणे तंदुरुस्त राहण्यासाठी योगा करत असतात.
आज शनिवारी, योग दिनी, अभिनेत्रीने स्वतःचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओतील अभिनेत्रीची एनर्जी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. वर्कआऊट आणि योगा करतानाचा व्हिडीओ अभिनेत्री नितू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला नीतू कपूर यांनी ‘योगापूर्वी काही वेट ट्रेनिंग’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्ही तरुणांसाठी खऱ्या प्रेरणा आहात’. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘या वयातही तुम्ही इतक्या चपळतेने कसरत करत आहात, हे कौतुकास्पद आहे’. नीतू कपूरची मुलगी रिद्धिमा हिनेही तिच्या आईच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.
हेही वाचा: यंदाचा योग दिवस अमृता खानविलकरसाठी ठरला खास; केदारनाथचं दर्शन घेत…





