Ankita Walawalkar Post : २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी सर्वांत मोठा धक्का देणारा ठरला. कोणाच्या ध्यानी मनी नसताना अशी एक घटना घडली, ज्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वजण आवाक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी म्हणजेच काल शनिवारी ३१ जानेवारी या दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या असून, अंकिता वालावलकर हिने लक्ष वेधून घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया समोर येत असून, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी या निर्णयावर टीकाही केली आहे. शपथविधीची एवढी घाई का केली? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय राऊत यांनी देखील याबाबत सवाल उपस्थित केला आहे. अशातच अंकिता वालावलकर हिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत, “सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोप्प असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवते आहे, तिच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणत नाही,” अशा शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. अंकिता वालावलकर हिची सोशल मीडिया पोस्ट नेमकं काय म्हणाली अंकिता वालावलकर? सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोप्प असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवते आहे, तिच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणत नाही. संवेदनशीलता आणि समजूतदारपणा या गोष्टी आजच्या काळात फार गरजेचे आहेत. राजकारणात टीका होणारच, प्रश्न विचारले जाणारच पण व्यक्तिगत दुःखावर उपहार करणं हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे. असे अंकिताने पोस्टमध्ये म्हटले आहे. तीन खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. त्यांना काल शनिवारी ३१ जानेवारी या दिवशी राज्याचे राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्याकडे असलेले राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ या तीन खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले असून तेच राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील अशी शक्यता आहे. हेही वाचा : Gold-Silver Crash: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 26,000 तर सोने 13,000 रुपयांनी स्वस्त