सार्वजनिक ठिकाणी ‘शर्लिन चोप्रा’ने केलं असं काही की, अभिनेत्रीची टोन्ड बॉडी पाहून फॅन्स झाले बेकाबु

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती ‘राज कुंद्रा’च्या अटकेनंतर रातोरात प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री ‘शर्लिन चोप्रा’ कायमच आपल्या बोल्ड अँड हॉट लूकने फॅन्सला घायाळ करत असते. शर्लिन चोप्राने टिलीव्हिजन रियालिटी शो “बिग बॉस-3′ आणि ‘स्प्लिट्ससविला सीजन -6’ मध्ये सहभाग घेतला होता. ती त्या शोपासून खूपच चर्चेमध्ये आली होती.
तसेच यापूर्वी शर्लिन अभिनेता शाहिद कपूर आणि राणी मुखर्जीसोबत चित्रपट “दिल बोले हड़िप्पा’ या चित्रपटात झळकली होती. सोशल मीडियावर शर्लिनच्या हॉट अदा आणि हॉटनेसचे चाहते खूपच कौतुक करत असतात. फिटनेसबाबत ही आग्रही असलेल्या शर्लिन चोप्राला योगा आणि जिम करायला प्रचंड आवडते.
View this post on Instagram
शर्लिन चोप्रा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा मादक आणि बोल्ड लूक चाहत्यांना अक्षरशः हा घायाळ करतो. तिचे बोल्ड फोटो सोशलवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. शर्लिन तिच्या बोल्ड शैलीसाठी विशेष ओळखली जाते.
दरम्यान, नुकतंच शर्लिनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामध्ये देखील तिने आपल्या बोल्ड लुकचा जलवा दाखवला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर मीडियासाठी पोज देताना तिचे जॅकेट काढताना दिसत आहे. शर्लिन इतक्या बोल्ड पद्धतीने मीडियासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही तिचे सर्व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शर्लिनच्या या व्हिडिओमध्ये तिची टोन्ड बॉडी तिच्या चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते अभिनेत्रीच्या फिगरचे खूप कौतुक करत आहेत. शर्लिनला आवडणाऱ्या लोकांची कमी नाही. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो-व्हिडिओ शेअर करताच तो लगेच व्हायरल होतो.





