बारामती – गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रतीक्षेत आणि चर्चेत असलेली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह एकवीस उमेदवारांना संधी मिळाली आहे.
निंबूत खंडाळा गट क्रमांक एकमधून जितेंद्र निगडे, लक्ष्मण गोफणे, अभिजीत काकडे यांना संधी मिळाली असून, मुरूम वाल्हा गटातून विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिवाजीराव शिंदे, ऋषिकेश गायकवाड यांना संधी मिळाली आहे.
होळ – मोरगाव गटातून आनंदकुमार होळकर, शिवाजी राजे द्वारकोजीराव राजे निंबाळकर व किसन तांबे यांना संधी मिळाली आहे. कोऱ्हाळे-सुपा गटातून माजी उपाध्यक्ष सुनील भगत, रणजीत मोरे व हरिभाऊ भोंडवे यांना संधी मिळाली आहे. पुरंदर तालुक्यातील मांडकी – जवळार्जुन गटामध्ये विश्वास मारुती जगताप, बाळासाहेब ज्ञानदेव कामथे व शांताराम शिवाजी कापरे यांना संधी मिळाली आहे.
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून प्रवीण कांबळे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटामधून शैलेंद्र रासकर, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून आनंद तांबे यांना; तर महिला राखीव गटातून कमल पवार व प्रणिता खोमणे यांना संधी मिळाली आहे. ब वर्ग गटातून संग्राम सोरटे हे निवडणूक लढवणार आहेत.