Chhagan Bhujbal : “काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात”; छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य
गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात, असे त्यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal – राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली सूचक वक्तव्य सुरुच ठेवली आहेत.
गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात, असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मते मांडतो. भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याची चर्चा आता रंगली आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मोठी प्रगती करेल, असेही त्यांनी म्हटले. दिवंगत अजित पवार सोडून गेले, त्यानंतर सुनेत्रा पवार पुढे आल्या आहेत.
अनेकांना वाटते आम्हाला पक्षाने काही दिले नाही. प्रत्येकाने काम करत राहिले पाहिजे. पदे कमी असतात, पण पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. एकजुटीने काम करत राहावे, असे सांगतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.





