“कहीं खुशी, कहीं गम’

वडूज -खटाव पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून “कही खुशी कही गम’असे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणी इच्छुकांच्या दांड्या उडाल्याने पतीऐवजी पत्नींना संधी मिळणार आहे.
येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात नियंत्रण आधिकरी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी क्र. 2 श्रीमती संगीता चौगुले, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदय साळुंखे यांनी पंचायत समितीच्या 16 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामध्ये अनुसूचित जाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन, मागास प्रवर्ग महिला एक, सर्वसाधारण सहा, सर्वसाधारण महिला पाच असे आरक्षण पडले आहे.
यामध्ये डिस्कळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, बुध सर्वसाधारण, पुसेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, विसापूर सर्वसाधारण, खटाव सर्वसाधारण, तडवळे नागरिकांचा मागास प्रवर्ग, एनकूळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, निमसोड, सिद्धेश्वर कुरोली, गुरसाळे, जायगाव, मायणी सर्वसाधारण महिला, औंध गणासाठी अनुसूचित जाती महिला, पुसेसावळी, म्हासुर्णे,कलेढाण येथे सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. यावेळी संतोष देशमुख, निलेश देशमुख, विजय शिंदे, बाळासाहेब पोळ, धनंजय चव्हाण, योगेश जाधव, सोमनाथ साठे, लालासो माने, गणपत खाडे, सतीश साठे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





