हिसाब तो देना पाडेगा ! संजय राऊतांना ED ची नोटीस येताच सोमैय्या यांचे ट्विट

मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. संजय राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या २८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या ED नोटीस प्रकरणावरून भाजपचे किरीट सोमैय्या यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ हिसाब तो देना पाडेगा ‘ असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत साहेब,
तुम्ही मला, माझा पत्नी ला, माझा मुलगा नील ला, आई ला…..
जेल मध्ये टाकायचे प्रयत्न करा….धमक्या द्या,
हल्ले करा
शिव्या द्या….
परंतु
"हिसाब तो देना पडेगा " @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 27, 2022
हिसाब तो देना पडेगा
किरीट सोमैय्या यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, “संजय राऊत साहेब,तुम्ही मला, माझा पत्नी ला, माझा मुलगा नील ला, आई ला…..जेल मध्ये टाकायचे प्रयत्न करा… धमक्या द्या, हल्ले करा ,शिव्या द्या.परंतु “हिसाब तो देना पडेगा ” अशा आशयाचे ट्विट किरीट सोमैय्या यांनी करीत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
या..मला अटक करा
तर दुसरीकडे ED ची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी देखील ट्विट करीत ‘ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! ‘ असे म्हंटले आहे.
संजय राऊत आणि किरीट सोमैय्या यांच्यातील वाद काही नवा नाही. अनेकदा यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना तसेच सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना अडचणीत आली असताना किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांना ‘हिसाब तो देना पडेगा’ म्हणत डिवचले आहे.





