पाकिस्तानशी लढताना जवान मुरली नाईक शहीद, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याशी लढताना मुंबईतील जवान मुरली नाईक शहीद झाले. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याचे दोन विमाने पाडली आणि सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे. शहीद जवान मुरली नाईक हे २३ वर्षांचे होते. त्यांचे वीरमरण समजताच, त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
मुरली नाईक मूळचे आंध्र प्रदेशातील असून त्यांचे वडील श्रीराम नाईक मुंबईतील घाटकोपर भागात मजुरीचे काम करत होते. आपल्या मुलाला सैन्यदलात भरती करण्यासाठी त्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं. २०२२ मध्ये भारतीय सैन्यात नोकरी लागलेले मुरली नाईक यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती. त्यानंतर आसाम, पंजाब आणि उरी सेक्टरमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते.
దేశ రక్షణలో శ్రీ సత్యసాయి జిల్లా, పెనుకొండ శాసనసభ నియోజకవర్గం, గోరంట్ల మండలానికి చెందిన మురళి నాయక్ అనే సైనికుడు ప్రాణాలు కోల్పోవడం విషాదకరం. దేశం కోసం ప్రాణాలర్పించిన అమరవీరుడు మురళి నాయక్ కు నివాళులు. ఆయన కుటుంబ సభ్యులకు ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. pic.twitter.com/QGtIAxMjug
— N Chandrababu Naidu (@ncbn) May 9, 2025
त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त मिळताच मुंबईतील कुटुंबीय, स्थानिक लोक आणि आंध्र प्रदेशमधील गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवाची अंत्यविधी १० मे रोजी त्यांच्या मूळ गावी आंध्र प्रदेशातील कल्की तांडा येथे होणार आहे.





