Solapur ST Accident । सोलापूर जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय. याठिकाणी एका एसटी चालकाला गाडी चालवतानाच फिट आल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टेंभुर्णी – कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एसटीला अपघात झाला आहे. चालकाल फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी Solapur ST Accident । प्राप्त माहितीनुसार, टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना अपघात झाला. एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. कुर्डूवाडी डेपोची बस ही वैरागवरुन स्वारगेटकडे जात असताना पिंपळनेर नजीक पलटी झाली. या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले आहेत. एस्टी बसच्या चालकाला फीट आल्याने दुर्घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरुप बचावले Solapur ST Accident । एसटी चालकाला फीट आल्यामुळे बस शेतात घुसली. पिंपळनेर नजीक आल्यानंतर एसटी चालकाला फीट आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कडेला गेली.. चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात घुसली थोड्या अंतरावर गेल्यानंतर एसटी उलटली. या प्रकारामुळे एसटीत असलेले प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते. मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाही अथवा जीवितहानी झाली नाही. सुदैवाने हा अपघात कमी रहदारीच्या ठिकाणी घडला. अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.