सोलापूर : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. ओवैसी त्यांच्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये आले होते.यादरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओवैसी यांना पोलिसांकडून मंचावरच नोटीस देण्यात आली आहे. काय लिहिले नोटीसमध्ये? ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस पोलिसांनी दिली. पोलिसांनी ओवैसी यांना भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस देण्यात आली होती. नोटिसीची उडवली खिल्ली या नोटीसचा उल्लेख ओवैसी यांनी आपल्या भाषणात करत टीका केली. असदुद्दीन ओवैसी यांनी संबंधित नोटीस जाहीर भाषणात वाचून दाखवत उडवली खिल्ली उडवली. त्यांनी इंग्रजीमध्ये दिलेल्या नोटीसमधील स्पेलिंग मिस्टेक दाखवत खिल्ली उडवली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.