सोलापूरात आई व मुलाने एकाचवेळी घेतला गळफास
Updated On:

सोलापूर – आई व मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सोलापूरातील शेळगी परीसरातून समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माय लेकाने हे टोकाचे पाऊन का उचलले हे अद्याद कळू शकले नाही.
उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक ( 62 वर्ष ) आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक ( 42 वर्ष ) असे मृत माय लेकाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळपासून घरात सामसूम दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आत डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.





