Solapur Politics : मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला; उत्तमराव जानकरांचा गंभीर आरोप
Solapur Politics : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अत्यंत टोकाच्या पातळीवर पोहोचला आहे.

Solapur Politics : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर केसाने गळा कापल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Solapur Politics)
उत्तमराव जानकर यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त करत सांगितले की, माझ्या मुलाची उमेदवारी निश्चित झाली होती आणि त्यावर अर्जुनसिंह मोहिते-पाटलांची स्वाक्षरीही होती. मात्र, अचानक वसंतराव देशमुख यांचा अर्ज भरणे आम्हाला खटकले. ऐनवेळी देशमुखांनी फोन बंद केला. (Solapur Politics)
ज्यांच्याकडे एकही मत नाही, त्यांना उमेदवारी देऊन मोहिते-पाटलांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत जानकर यांनी या निवडणुकीत देशमुखांना मतदान न करण्याची घोषणा केली. या वादाचा थेट फायदा भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळण्याची शक्यता आहे. (Solapur Politics)
दुसरीकडे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. हा आमच्या घरातला प्रश्न असून आम्ही तो घरात बसूनच सोडवू. घरातील विषय चव्हाट्यावर मांडणे माझी पद्धत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे सोलापुरात मोहिते-पाटील विरुद्ध जानकर असा नवा संघर्ष पेटला आहे. (Solapur Politics)





