Solapur Accident : तांदुळवाडी अपघात प्रकरणात रस्ते कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील (Solapur Accident) तांदुळवाडी गावाजवळ रविवारी दुपारी एका पिक-अप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीत पडून अपघात झाला होता.

Solapur Accident : जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील (Solapur Accident) तांदुळवाडी गावाजवळ रविवारी दुपारी एका पिक-अप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीत पडून अपघात झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका रस्ते कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ एक पिक-अप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत (Solapur Accident) पडून चार महिला आणि चार मुलांसह एकूण आठ जण ठार झाले, तर सात जण जखमी झाले होते.
या भागात रस्ते विकासाचे काम करणाऱ्या नवजोत गढोक यांच्या कंपनीचे नावही एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला शेतातील विहीर असल्याची माहिती असूनही कंत्राटदाराने अपघातस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात कसूर केली.
महामार्गालगत विहीर असल्याची कंत्राटदाराला कल्पना होती, परंतु त्यांनी त्या ठिकाणी संरक्षक कठडे, धोक्याच्या सूचना देणारे फलक, गतिरोधक आणि रिफ्लेक्टर्स बसवले नाहीत. आम्ही नवजोत गढोक आणि त्यांची कंपनी रोडवेज कन्स्ट्रक्शन्स यांच्याविरुद्ध गुन्हा (Solapur Accident) दाखल केला आहे, असे वेळापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.





