सातारा – आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी विकास सेवा सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गाव पातळीवरील सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सोसायटीचा वाटा सिंहाचा असतो, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. निगडी वंदन (ता. सातारा) येथील सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे भाजप नेते मनोज घोरपडे, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी चेअरमन रामचंद्र जगदाळे, माजी व्हाईस चेअरमन राजू पाटील, माजी संचालक उत्तम घाडगे, रमेश कणसे, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, संचालक धनाजी जाधव, जिल्हा सहकारी बोर्डाचे माजी चेअरमन धनंजय शेडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलासराव शेडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक देवानंद पिसाळ, माण- खटाव ऍग्रोचे संचालक कृष्णात शेडगे, नितीन कणसे, विघ्नहर्ता सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर कणसे, संदीप मांडवे, विलास मांडवे, सोसायटीचे चेअरमन अण्णासो शेळके, सरपंच संतोष मांडवे, जयवंत जाधव, प्रदीप यादव, संभाजी मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सोसायटयांनी आपला सभासद शेतकरी आर्थिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. गट- तट न मानता सोसायटीने सर्व सभासदांना आर्थिक सक्षम करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. कार्यक्रमास अंगापूर पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी, निगडी गावचे ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.