Sobhita Dhulipala : “…त्यामुळे अशा गोष्टी फार मनावर घेण्याची गरज नसते”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
Sobhita Dhulipala : त्यामुळे अशा गोष्टी फार मनावर घेण्याची गरज नसते. व्यक्तीने आतून मजबूत आणि संतुलित राहणे महत्त्वाचे आहे.” असे महत्वाचे भाष्य तिने केले.

Sobhita Dhulipala : अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांनी डिसेंबर २०२४ मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विवाह केला. या विवाहाची मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली होती.
त्याआधी ऑगस्ट २०२४ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाआधी बराच काळ त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगत असतानाही दोघांनीही त्यावर कधीही सार्वजनिकपणे भाष्य केले नव्हते.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शोभिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी होणाऱ्या चर्चांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. मुलाखतीत तिला तू स्वत: ट्रोलिंगपासून कशी दूर राहते, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “लोकांमध्ये उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. मी माझं आयुष्य जगत होते आणि इतरांच्या अपेक्षांनुसार प्रतिक्रिया देण्याची गरज मला वाटली नाही. आज मी आयुष्यातील खूप चांगल्या टप्प्यावर आहे. काळानुसार माझा आत्मविश्वास वाढला असून आता टीका किंवा मतभेदांचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही.”
हेही वाचा : Abhishek Banerjee Attack: बंगाल पोलिस ऍक्शन मोडमध्ये ; अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणात ५ आरोपींना अटक
तिने पुढे सांगितले की, “सामाजिक वातावरण हे हवामानासारखे असते. जसे हवामान बदलते, तसेच लोकांच्या चर्चा आणि मतप्रवाहही बदलतात. त्यामुळे अशा गोष्टी फार मनावर घेण्याची गरज नसते. व्यक्तीने आतून मजबूत आणि संतुलित राहणे महत्त्वाचे आहे.” असे महत्वाचे भाष्य तिने केले.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा २०२२ मध्ये सुरू झाल्या होत्या. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर वर्षभराने दोघेनींही एकाच ठिकाणांहून एकत्रित फोटो शेअर केले होते. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना अधिक जोर आला होता.
दरम्यान, शोभिता नुकतीच एका तेलुगू क्राईम-थ्रिलर मालिकेत झळकली असून आता ती दिग्दर्शक पा. रणजीत यांच्या आगामी तमिळ सायन्स-फिक्शन चित्रपटात दिसणार आहे. तर नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘वृषकर्मा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. सध्या नागा चैतन्य आणि शोभिता वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत, तर समंथा रुथ प्रभूही आपल्या आयुष्यात पुढे जात नव्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करत आहे.
हेही वाचा : Nilesh Pardhye’s post : ‘चिमणे, परत ये, खूप काही सांगायचं…’, रोहिणीच्या आठवणीत पती निलेशची भावूक पोस्ट





