नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष (Bjp) इतर मागासवर्गीय (Obc) मोर्चाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली. पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे नेते सूरथ बिस्वाल यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गांधींच्या नुकत्याच ओडिशा भेटीदरम्यान केलेल्या विधानाचा निषेध केला.
बिस्वाल म्हणाले, आम्ही राहुल गांधींना त्यांची जात किंवा त्यांच्या आईची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची जात विचारली नाही. पण देशातील ओबीसींना हक्क आणि ओळख देणाऱ्या पंतप्रधान मोदींची जात ते विचारत आहेत.
राहुल गांधींच्या वक्तव्यातून त्यांची अपरिपक्वता स्पष्टपणे दिसून येते. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाच्या आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काय म्हणाले होते राहुल गांधी
राहूल गांधींनी दावा केला होता की मोदींचा जन्म ओबीसी कुटुंबात झाला नाही आणि त्यांच्या जन्माच्या दशकांनंतर त्यांची जात गुजरातच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आली होती. मोदी स्वत:ला ओबीसी सांगून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.