पवना धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग सुरू

पिंपरी – पवना धरण ( pavana dam ) परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात प्रचंड वेगात पाणी येत आहे. त्यामुळै पवना धरणातून १४०० क्येसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये वाढ/घट करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण ( pavana dam ) परिसरात आत्ताही पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे धरणात प्रचंड वेगाने पाणी येत आहे. सकाळी सहा वाजता पवना धरणात ६७.८० इतका साठा होता. आत्ता दुपारी बारा वाजता धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून सध्या धरणात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पवना धरणातून १४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
दरम्यान चिंचवडमधील तानाजीनगर, लक्ष्मीनगर भागात नदीचे पाणी आले आहे. लक्ष्मीनगर येथील १५० जणांना स्थलांतरीत केले आहे. तर तानाजीनगर, पोदार शाळेजवळही नदीचे पाणी आल्यने येथील पाच सोसायट्यांमधील नागरिक स्थलांतरीत झाले आहेत.





