“…तर मनोज जरांगे यांनी राजकारणात यावं”; प्रवीण दरेकर यांचे मनोज जरांगेंना आव्हान

Pravin Darekar VS Manoj Jarange| मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. यातच 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले होते. यानंतर प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंना प्रतिउत्तर दिले आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
मनोज जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. पवारांना त्यांनी आरक्षणाबाबत विचारावं. ते ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मराठा आरक्षणाबाबत काही विचारत नाहीत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास येत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याच प्लॅनिंग करताय. राजकीय भूमिका घ्यायची असेल तर मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे. जरांगे यांनी राजकीय अजेंडा न राबवता मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, तुमचे देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार हेच लक्ष्य आहे की मराठ्यांचा प्रश्न हे लक्ष्य आहे?” असा सवालही दरेकर यांनी केला. Pravin Darekar VS Manoj Jarange|
पुढे दरेकर म्हणाले, “तुम्ही अंतरवालीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसणार आणि प्लानिंग कसले करणार की कोणत्या मतदारसंघात जायचे, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणणार. म्हणजे तुम्ही पूर्णत: राजकीय झाला आहात. राजकीय भूमिका घ्यायची असल्यास मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे.सरकारकडे आम्ही तुमचे दूत म्हणून काम करण्यास तयार आहोत. परंतू, तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास आता यायला लागलाय तसे असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या,” असे आव्हानही दरेकर यांनी केले आहे. Pravin Darekar VS Manoj Jarange|
हेही वाचा :
“आम्हाला सर्वात जास्त मत, पण आम्ही कोणताही ‘मी’ पणा करणार” ; नाना पटोले यांचे सूतोवाच





