Assembly Elections 2024 । Maharashtra – येथे झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला उशीर का? प्रश्नाचे उत्तर खुद्द निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. तर सणांची यादी वाचत काही कामं कशी राहिली आहेत, यावर देखील त्यांनी भाष्य केले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती.
हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे.
सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची काम देखील झालेली नाहीत. अनेक सण आहेत, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.