Smriti Mandhana : स्मृती मंधानाची कमाल! सिद्रा-ताजमिनला मागे टाकत ICC च्या प्रतिष्ठित पुरस्कारावर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Smriti Mandhana wins ICC Awards : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने सप्टेंबर 2025 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली आहे. या शानदार प्रदर्शनामुळे तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सप्टेंबर 2025 साठी महिला ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. आता आयसीसीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, स्मृती मंधानाने हा विशेष पुरस्कार जिंकला आहे.
सप्टेंबरमध्ये मंधानाची दमदार कामगिरी –
सप्टेंबर 2025 मध्ये स्मृती मंधानाने एकूण 4 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तिने 77 च्या सरासरीने 308 धावा केल्या. यात तिच्या दोन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या कालावधीत तिचा स्ट्राइक रेट 135.68 इतका प्रभावी होता. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मंधानाला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, मंधानाने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. यापूर्वी तिने जून 2024 मध्ये आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार पटकावला होता.
सिद्रा अमीन आणि ताजमिन ब्रिट्स टाकले मागे –
✨ शानदार उपलब्धि! 🇮🇳
टीम इंडिया की उपकप्तान और स्टार बल्लेबाज़ स्मृति मंधाना को सितंबर 2025 के लिए ICC महिला प्लेयर ऑफ द मंथ चुना गया। 👏🏆#SmritiMandhana #ICCAwards #TeamIndia #WomenInBlue pic.twitter.com/8IR4E8jESb
— Doordarshan Sports (@ddsportschannel) October 16, 2025
आयसीसीने सप्टेंबर 2025 साठी महिला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी स्मृती मंधानासह पाकिस्तानच्या सिद्रा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताजमिन ब्रिट्स यांचेही नामांकन केले होते. मात्र, मंधानाने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकत हा पुरस्कार आपल्या नावे केला. पुरस्कार जिंकल्यानंतर मंधाना आपला आनंद व्यक्त करताना म्हणाली, “हा पुरस्कार जिंकल्याचा मला खूप आनंद आहे. अशा प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्याने ते पुढे आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित होतात.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : ‘मी तुम्हाला बोलावलं नव्हतं…’, जस्सीचा पापारांझीवर अचानक का चढला पारा? VIDEO होतोय व्हायरल
महिला वनडेमधील शतकांचा विक्रम –
महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत स्मृती मंधाना संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. तिच्यापुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग आहे. मंधानाच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिची ही कामगिरी पुढील सामने आणि स्पर्धांमध्येही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.





