Smriti Mandhana : ‘…हे मला खरंच वाटत नव्हतं’, लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृतीने पहिल्यांदाच केली पोस्ट; म्हणाली, ‘मी देवाची..

Smriti Mandhana post video after wedding postponed : टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबर रोजी लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या दिवशी सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली आणि लग्न अचानक स्थगित करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबद्दल अफवा पसरल्या होत्या. आता या सर्व घडामोडीनंतर स्मृतीने एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे.
स्मृतीने पोस्ट केला एक व्हिडीओ –
लग्न स्थगित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचे दावे करणाऱ्या काही चॅट्सही व्हायरल झाल्या होत्या, मात्र याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. या सर्व गोंधळात, स्मृतीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण तिने लग्न स्थगित झाल्यानंतर पलाशसोबतच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या आणि एकदाच बायोमध्ये थोडा बदल केला होता.
काय म्हणाली स्मृती?
View this post on Instagram
दरम्यान, स्मृतीने आता एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती एका मुलाखतीत तिच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलताना दिसत आहे. मुलाखतीच्या सुरुवातीला ती स्वतःची ओळख करून देते. त्यानंतर वर्ल्डकप विजयाबद्दल बोलताना ती म्हणते, “आम्ही विश्वविजेता ठरलो हे मला खरंच वाटत नव्हतं. १२ वर्ष क्रिकेट खेळताना दरवेळी वर्ल्डकपमध्ये आम्हाला अपयश येत होते. पण जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा आम्ही लहान मुलांसारखे फोटो काढत राहिलो. तसेच, फलंदाजीच्या वेळी मी रिलॅक्स होते पण फिल्डिंग करताना मी सगळ्या देवांची नावं घेत होते.”
हेही वाचा – AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू
लवकरच लग्न होणार – पलाशच्या आईचे विधान
दरम्यान, स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने मानधना कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. या गोंधळात पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांचे विधान चर्चेत आले आहे. अमिता यांनी स्पष्ट केले की, सर्वकाही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होईल. पलाशचे स्मृतीच्या वडिलांशी खूप जवळचे नाते आहे आणि त्यांच्या प्रकृतीमुळेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र लवकरच हा विवाहसोहळा पार पडेल.





