Smriti Mandhana : ICC ची मोठी घोषणा ! स्मृती मानधना ठरली महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर

वुमेन्स टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. सांगलीच्या स्मृतीची ICC महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. ICC कडून याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी वनडे सामन्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीचे तिला फळ मिळाले आहे.
स्मृती मानधनाने गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करत 13 सामन्यांत 747 धावा केल्या होत्या. एका कॅलेंडर वर्षात तिने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. तिच्या या खेळीमुळे भारताने अनेक सामन्यांत विजय मिळवला होता. स्मृती मानधनाने 57.86 च्या सरासरीने आणि 95.15 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. तर आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावादेखील तिच्याच नावावर आहेत.
For the second time, one of the leading stars of the game takes out the ICC Women’s ODI Cricketer of the Year award 🌟 pic.twitter.com/LJbgA8OobX
— ICC (@ICC) January 27, 2025
मूळची महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असणारी स्मृती मानधना आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर ठरलीये. त्यामुळे आता महाराष्ट्राची मान देखील गर्वाने उंचावली आहे. आयसीसीने नुकताच सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय संघ जाहीर केला होता ज्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश होता. यामध्ये स्मृती मानधना सोबत ऑल राऊंडर दीप्ती शर्मादेखील स्थान देण्यात आले आहे.
2024 आईसीसी महिला वनडे टीम ऑफ द ईयर:
स्मृति मंधाना (भारत), एल वोल्वार्ड्ट (कर्णधार) (दक्षिण अफ्रीका), चमारी अट्टापट्टू (श्रीलंका), हेली मैथ्यूज (वेस्टइंडीज), मारिजाने कैप (दक्षिण अफ्रीका), एश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), एनाबेल सदरलैंड (ऑस्ट्रेलिया), एमी जोन्स (विकेटकीपर) (इंग्लैंड), दीप्ति शर्मा (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), केट क्रॉस (इंग्लंड)





