Smriti Mandhana : ‘नॅशनल क्रश’ स्मृती मंधाना सुसाट! एकाच सामन्यात विराटच्या विक्रमासह मोडले ६ मोठे रेकॉर्ड

Smriti Mandhana break 6 records : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाता शनिवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४३ धावांनी पराभव करत मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. मात्र, या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने वादळी शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले. तिने ६३ चेंडूत १२५ धावांची आक्रमक खेळी साकारत अनेक विक्रम मोडले, ज्यात किंग कोहलीच्या विक्रमाचाही समावेश आहे.
स्मृतीने मोडला विराटचा विक्रम –
या निर्णायत सामन्यात स्मृती मंधानाने अवघ्या ५० चेंडूंत शतक ठोकत भारतातील सर्वात वेगवान वनडे शतकाचा विक्रम नोंदवला, ज्याने विराट कोहलीचा ५२ चेंडूंचा विक्रम (२०१३) मागे टाकला. तिचे हे शतक महिलांच्या वनडे क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले, फक्त मेग लॅनिंगच्या ४५ चेंडूंच्या विक्रमापासून पाच चेंडूंनी मागे राहिले. याशिवाय, तिने सुजी बेट्ससोबत महिलांच्या वनडेत १३ शतकांसह संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक शतक –
1⃣2⃣5⃣ runs
6⃣3⃣ deliveries
1⃣7⃣ fours
5⃣ sixesEnd of an extraordinary knock from #TeamIndia vice-captain Smriti Mandhana 👏👏
Updates ▶️ https://t.co/Z0OmZGVfVU#INDvAUS | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/iuyCqxcGVl
— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025
२०२५ मध्ये तिच्या चार शतकांनी टॅमी ब्यूमॉंट आणि नॅट स्किव्हर-ब्रंट यांच्यासोबत एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक शतकांचा विक्रमही कायम राखला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिच्या चार शतकांनी तिला मेग लॅनिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आणले. विशेष म्हणजे, तिचा १९८.४१ चा स्ट्राईक रेट १००+ धावांच्या डावात दुसऱ्या क्रमांकावर ठरला, बेथ मूनीचा १८४ चा विक्रम मागे टाकत.
या सामन्यातील ७८१ धावांची एकूण संख्या महिलांच्या वनडेत सर्वोच्च ठरली. जरी ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली, तरी मंधानाची ही खेळी आगामी आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ साठी तिची दमदार तयारी दर्शवते. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना अभिमानास्पद क्षण दिले.
हेही वाचा –SL vs BAN : तौहीद-सैफच्या जोरावर बांगलादेशचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सुपर-4 मध्ये धमाकेदार सुरुवात!
स्मृती मंधानाने तिसऱ्या वनडे मोडलेले सहा मोठे विक्रम ;
- भारतातील सर्वात वेगवान वनडे शतक: स्मृती मंधानाने ५० चेंडूंत शतक ठोकत विराट कोहलीचा ५२ चेंडूंचा विक्रम (२०१३, ऑस्ट्रेलियाविरुद्ध) मोडला.
- महिलांच्या वनडेत दुसरे सर्वात वेगवान शतक: ५० चेंडूंत शतक, मिग लॅनिंगचा ४५ चेंडूंचा विक्रम (२०१२, न्यूझीलंडविरुद्ध) फक्त ५ चेंडूंनी मागे राहिला.
- महिलांच्या वनडेत १३ वे शतक: सुजी बेट्ससोबत (न्यूझीलंड) संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर बरोबरी.
- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके (संयुक्त): २०२५ मध्ये ४ शतके, स्वतःच्या २०२४ च्या विक्रमासह टॅमी ब्यूमॉंट आणि नॅट स्किव्हर-ब्रंटसोबत बरोबरी.
- एका विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक शतके (संयुक्त): ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ शतके, मेग लॅनिंगच्या ६ शतकांनंतर (न्यूझीलंडविरुद्ध) दुसऱ्या क्रमांकावर.
- उच्च धावसंख्येच्या डावातील दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट: १००+ धावांच्या डावात १९८.४१ चा स्ट्राईक रेट, बेथ मूनीचा १८४ चा विक्रम मोडला.





