IND W vs AUS W : नाद करा पण स्मृतीचा कुठं! किंग कोहलीलाही मागे टाकत रचला नवा इतिहास

Smriti Mandhana Break Virat Kohli Record : महिला वनडे विश्वचषक 2025 च्या 13व्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 331 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने 66 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. या खेळीदरम्यान मंधानाने वनडे क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पा गाठला आणि भारताकडून (पुरुष आणि महिला) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 5,000 धावा करणारी खेळाडू बनली.
मंधानाने कोहलीचाही मोडला विक्रम –
स्मृती मंधानाने 112 डावांत 5,000 धावा पूर्ण केल्या, ज्यामुळे तिने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा 114 डावांत 5,000 धावा करण्याचा विक्रम मागे टाकला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर माजी सलामीवीर शिखर धवन आहे, ज्याने 118 डावांत हा टप्पा गाठला होता. याशिवाय, मंधानाने ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध सलग पाचव्यांदा 50 हून अधिक धावांच्या इनिंग्स खेळणारपी पहिली खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
🚨 SMRITI MANDHANA – FIRST FEMALE CRICKETER TO REACH 1,000 ODI RUNS IN A CALENDAR YEAR. 🚨pic.twitter.com/19oGnFSg1y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2025
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 5,000 धावा (डावांच्या आधारावर) करणारे खेळाडू:
1. स्मृती मंधाना – 112 डाव
2. विराट कोहली – 114 डाव
3. शिखर धवन – 118 डाव
4. सौरव गांगुली – 126 डाव
5. महेंद्रसिंह धोनी – 135 डाव
6. गौतम गंभीर – 135 डाव
हेही वाचा – IND W vs AUS W : मंधाना-रावलची ऐतिहासिक भागीदारी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोडला ५२ वर्षांचा विक्रम!
महिला वनडेमध्ये स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी –
स्मृती मंधाना महिला वनडे क्रिकेटमध्ये 5,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी भारताची दुसरी आणि एकूण पाचवी खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 58 धावा करताच तिने हा टप्पा गाठला. डाव आणि चेंडूंच्या बाबतीत ती महिला वनडेमध्ये सर्वात वेगाने 5,000 धावा करणारी खेळाडू ठरली. तिने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले, जिने 129 डावांत 5,000 धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs WI : कर्णधार गिलचा मैदानावर दिसला ‘सुपरमॅन’ अवतार, हवेत सूर मारत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO
सुझी बेट्सचाही मोडला विक्रम –
मंधानाने चेंडूंच्या बाबतीत वनडेमध्ये सर्वात वेगाने 5,000 धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने 6,182 चेंडूत 5,000 धावा केल्या होत्या, तर मंधानाने केवळ 5,569 चेंडूत हा टप्पा गाठला. मंधानाच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर मजबूत लक्ष्य ठेवले असून, सामन्याचा निकाल उत्सुकतेचा विषय ठरला आहे.





