IND W vs AUS W : सांगली एक्सप्रेस पुन्हा सुसाट…! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात केले दोन वर्ल्ड रेकॉर्ड

Smriti Mandhana Set Two World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानासाठी रविवारचा दिवस खास ठरला. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या लीग सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दोन जागतिक विक्रम आपल्या नावावर केले. या सामन्यात तिने ८० धावांची खेळी साकारत प्रतिका रावलसह पहिल्या विकेट्साठी १५५ धावांची शानदार भागीदारी केली.
स्मृती मंधानाच्या ५००० धावा पूर्ण –
स्मृती मंधानाने या ८० धावांच्या खेळीच्या जोरावर महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (WODI) क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५००० धावा पूर्ण करणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला. तसेच सर्वात कमी वयात हा टप्पा गाठणारी खेळाडू ठरली. एकूणच ती ही कामगिरी करणारी पाचवी फलंदाज बनली आहे.
A moment to cherish 🫡
Youngest and quickest to reach 5️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs in Women’s ODIs ✅
Smriti Mandhana is putting on a show in Vizag.
Updates ▶ https://t.co/VP5FlL3pWw#TeamIndia | #WomenInBlue | #INDvAUS | #CWC25 | @mandhana_smriti pic.twitter.com/X6M48wYHZW
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
डाव आणि चेंडूंच्या दृष्टीने जागतिक विक्रम –
स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ५८ वी धाव घेताच हा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिने अवघ्या ११२ डावांमध्ये आणि ५५६९ चेंडूंचा सामना करत ५००० धावांचा पल्ला पार केला. डाव आणि चेंडूंच्या दृष्टीने हा जागतिक विक्रम आहे. याशिवाय, वयाच्या २९ वर्षे आणि ८६ दिवसांमध्ये ती ५००० धावा करणारी सर्वात युवा फलंदाज ठरली.
हेही वाचा – IND W vs AUS W : स्मृती मंधानाचा ऐतिहासिक पराक्रम; महिला वनडेत ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिलीच खेळाडू
भारताची दुसरी महिला खेळाडू –
यापूर्वी डावांच्या बाबतीत सर्वात वेगवान ५००० धावा करणारी फलंदाज वेस्ट इंडीजची स्टीफन टेलर होती, जिने १२९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तर चेंडूंच्या दृष्टीने न्यूझीलंडच्या सूझी बेट्सने ६१८२ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. भारतासाठी मंधाना ही कामगिरी करणारी मिताली राजनंतर दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीपचा दबदबा! पाचव्यांदा ‘हा’ पराक्रम करत वॉर्डलच्या विक्रमाशी केली बरोबरी
याशिवाय इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स, वेस्ट इंडीजची स्टीफन टेलर आणि न्यूझीलंडची सूझी बेट्स यांनीही हा टप्पा गाठला आहे. मंधानाने या सामन्यात ६६ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी केली. यावेळी तिचा स्ट्राइक रेट १२१.२१ इतका होता. तिने या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली.





