IND vs SL : स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली जगातील तिसरीच महिला खेळाडू

IND vs SL Smriti Mandhana 11th ODI century : महिला तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करुन जेतेपद पटकावले. या सामन्यात भारताने स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर ३४३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २४५ धावांवर गारद झाला. दरम्यान स्मृतीने शतक झळकावत इतिहास रचला आहे.
स्मृती वनडेत सर्वाधिक शतकं झळकावणारी तिसरी महिला-
स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध ९२ चेंडूत तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. मंधानाने ११६ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि २ षटकार मारले. या काळात तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम मोडला. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारी मानधना भारतीय फलंदाज ठरली.
For her scintillating ton in the final, vice-captain Smriti Mandhana receives the Player of the Match award 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#TeamIndia | #WomensTriNationSeries2025 | #INDvSL | @mandhana_smriti pic.twitter.com/fGPmzxoJ5d
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
स्मृतीने मोडला हरमनप्रीत सर्वाधिक षटकारांचा विक्रम –
3⃣4⃣2⃣/7⃣
🔹 India’s fifth highest total in women’s cricket 👌
🔹 India’s highest total against Sri Lanka in Sri Lanka in women’s cricket 🙌
An excellent batting display by #TeamIndia in the #WomensTriNationSeries2025 Final 👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#INDvSL pic.twitter.com/bBgLwrXi4R
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
यासह महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेग लॅनिंग आणि सुझी बेट्सनंतर मानधनाने तिसरे स्थान पटकावले आहे. लॅनिंगने १५ शतके आणि बेट्सने १३ शतके झळकावली आहेत. मानधना ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करणारी खेळाडू देखील आहे. मानधना नंतर, मिताली राज दुसऱ्या स्थानावर आहे, जिने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात ६ शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा – IND vs SL : भारतीय महिला संघाने पटकावले तिरंगी मालिकेचे जेतेपद, श्रीलंकेचा उडवला धुव्वा
स्मृती मानधनाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५४ षटकार मारले आहेत. ती यादीत अव्वल स्थानावर आहे, तर हरमनप्रीत कौर ५२ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रिचा घोष २० षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्मृती मानधना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. तिने गेल्या २० डावांमध्ये ६ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. एकूणच, तिने १०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४६१ धावा केल्या आहेत.





