Smita Gondkar : स्मिता गोंदकरने मायदेशी परताच मानले एकनाथ शिंदेंचे आभार
Smita Gondkar : 'एक भारतीय म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो की कठीण काळात आपले सरकार आपल्या नागरिकांसोबत ठामपणे उभे आहे'

Smita Gondkar : अमेरिका-इस्रायल-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक हवाई वाहतुकी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या कारणामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर देखील कुटुंबियासोबत परदेशात अडकली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे ती भारतात परतली आहे.
स्मिता गोंदकरने एकनाथ शिंदेंसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “गेल्या काही दिवसांत आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला. मोठ्या स्फोटांचे आवाज, खिडक्या हादरणे, रात्री आकाशात दिसणाऱ्या क्षेपणास्त्रांचे प्रकाश, इंटरसेप्शन आणि पडणारे अवशेष या सगळ्यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होती.

Smita Gondkar
दिवसादेखील आकाशात लहान ढगांसारखी रचना दिसत होती. आम्ही सतत आशा करत होतो की परिस्थिती लवकरच शांत होईल आणि आम्हाला लवकरच घरी परतता येईल”. (Smita Gondkar)
“परंतु हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे आणि दररोज उड्डाणे रद्द होत असल्यामुळे वारंवार बुकिंग आणि चेक-इन करूनही घरी परतणे जवळजवळ अशक्य वाटत होतं. माझ्यासोबत कुटुंबातील काही ज्येष्ठ नागरिक होते. त्यामुळे ही चिंता आणखी वाढली. (Smita Gondkar)
या कठीण प्रसंगी मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंगेश चिवटे आणि अतिरिक्त आयुक्त राहुल गेथे यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला. मी त्यांचे आभार मानते. राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते वाहतुकीची सोय आणि भारतात सुरक्षित परतण्याचे समन्वय करण्यापर्यंत त्यांनी घेतलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होते”, असं तिने म्हटलं आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “आपल्या तत्पर कृती आणि पाठिंब्यामुळे केवळ माझे कुटुंबच नव्हे तर परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना सुरक्षितपणे भारतात परतता आले.
अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांप्रती असलेली आपली तत्परता आणि बांधिलकी ही खऱ्या नेतृत्वाचे आणि नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. एक भारतीय म्हणून मला याचा अत्यंत अभिमान वाटतो की कठीण काळात आपले सरकार आपल्या नागरिकांसोबत ठामपणे उभे आहे.”Smita Gondkar
दरम्यान, या संघर्षाच्या काळामध्ये युएईमध्ये अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अखेर सुखरूप मायदेशी परतली आहे. त्यानंतर तिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
हेही वाचा:





