मुंबई – ‘पप्पी दे पारूला’ या लोकप्रिय गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘स्मिता गोंदकर’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मोठया प्रमाणात फॉलो केले जाते.
मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटातून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दरम्यान, स्मिता गोंदकर एक प्रोफेशनल स्टंट बाइकर आहे. 2009 साली स्टंट मेनिया स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत पोहोचणारी ती एकमेव महिला स्पर्धक आहे.
एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी स्मिता पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच स्मिताच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
स्मिता गोंदकरने अमेरिकेत डिझनी क्रूझ लाइन या जहाजावर सुद्धा काम केले आहे. स्मिता गोंदकरची हॉलिवूड मधल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. कलाकाराने स्वत:ला मर्यादीत ठेऊ नये असे तिचे मत आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हे म्हटले होते.