Smart Meter: बारामती परिमंडळात महावितरणचा ‘स्मार्ट’ धमाका! ९ लाख ६९ हजार ग्राहकांना मोफत स्मार्ट मीटर
Smart Meter: बारामती, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात महावितरणची मोहीम गतीने; मानवी हस्तक्षेप टळल्याने ग्राहकांना मिळणार अचूक बिले.

Smart Meter – महावितरणच्या बारामती परिमंडळातील 22 लाख 9 हजार ग्राहकांपैकी 9 लाख 69 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहे. बारामती मंडळात बारामती, सातारा मंडळापैकी सोलापूर जिल्ह्यात काम स्मार्ट झाले आहे. महावितरणकडून ग्राहकांमध्ये जनजागृती करून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.
बारामती परिमंडळात ठिकठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी व गैरसमज दूर करण्यासाठी ग्राहक मेळावे, बैठका आयोजित करून जनजागृती केली जात आहे. घरगुती वर्गवारीत 19 लाख 33 हजार पैकी 8 लाख 18 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 1 लाख 85 हजारपैकी 83 हजार तर औद्योगिक वर्गवारीत 41 हजार 591 पैकी 28 हजार तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 48 हजार पैकी 39 हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत.
तरी ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत, असे आवाहन केले आहे. महावितरणकडून ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत बसविण्यात येत आहेत. सध्याचे स्मार्ट मीटर हे पोस्टपेड आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटरमुळे बिलिंग जास्त येते हा गैरसमज आहे. याउलट आधुनिक तंत्रज्ञानामुळे मीटरचे रिडिंग स्वयंचलित पध्दतीने होते आहे. परिणामी मानवी हस्तक्षेप टळून ग्राहकांना अचूक व वेळेत बिले मिळत आहेत.
ग्राहक मोबाइल ॲपवर वा पोर्टलवर दैंनदिन वीज वापर पाहू शकतात. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावर थेट नियंत्रण राहिल. याशिवाय सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान वीज वापरल्यास प्रति युनिट 85 पैशांची सवलत दिली जात आहे. बारामती मंडळातील 5 लाख 10 हजार ग्राहकांपैकी 2 लाख 21 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 4 लाख 39 हजारांपैकी 1 लाख 81 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 46 हजार 761 पैकी 23 हजार 173 तर औद्योगिक वर्गवारीत 10 हजार 122 पैकी 6 हजार 265 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 13 हजार 800 पैकी 10 हजार 533 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत.
सातारा मंडळातील 8 लाख 87 हजार ग्राहकांपैकी 3 लाख 30 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 7 लाख 90 हजारपैकी 2 लाख 81 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 67 हजार 208 पैकी 26 हजार 823 तर औद्योगिक वर्गवारीत 11 हजार 474 पैकी 7 हजार 858 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 18 हजार 147 पैकी 14 हजार 827 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत.
सोलापूर मंडळात सरस कामगिरी
सोलापूर मंडळातील 8 लाख 12 हजार ग्राहकांपैकी 4 लाख 17 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 7 लाख 42 हजार पैकी 3 लाख 56 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 71 हजार 626 पैकी 33 हजार तर औद्योगिक वर्गवारीत 19 हजार 995 पैकी 13 हजार 891 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 16 हजार 108 पैकी 13 हजार 862 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहेत.





